Need help? Talk to our expert.
WhatsApp


प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी हळदीच्या दूधाचे फायदे आणि हे कसे बनवायचे

Metropolis Healthcare
Last Updated May 02, 2025
Marathi
प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी हळदीच्या दूधाचे फायदे आणि हे कसे बनवायचे

प्रस्तावना

आरोग्यम् धन संपदा असे नेहमीच म्हणले जाते आणि ते नाकारता येऊच शकत नाही - विशेषतः सध्याच्या आपल्या वैश्विक आरोग्य समस्या बघता तर नाहीच. आजकाल, काळाची गरज म्हणून प्रतिकार शक्ति वाढवणे हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील स्पर्धेचा विषय झाला आहे. भारतातील घराघरात अनेक दशकांपासून वापरले जाणारे एक प्रभावी औषध म्हणजे हळदीचे दूध! हे "सोनेरी दूध" नक्की आहे तरी काय आणि याचे काय काय फायदे आहेत? चला जाणून घेऊयात.

पोषणासंबंधी माहिती

'हळदीचे दूध', ज्याला 'सोनेरी दूध देखील म्हणतात, एक भारतीय पारंपरिक पेय आहे जे गाईचे दूध किंवा वनस्पतीजन्य दूध गरम करून त्यात हळद आणि इतर मसाले जसे दालचीनी आणि सुंठ घालून तयार केले जाते. हे जर्द पिवळे मिश्रण आयुर्वेदिक औषधांपैकी एक म्हणून शतकांपासून प्रसिद्ध आहे, आणि ते शक्य आहे केवळ यातील पोषण मूल्यांमुळे.

खाली काही पोषक तत्वे आहेत जी तुम्हाला एका गरम गरम, आरामदायक हळद दुधाच्या कपामधून मिळू शकतात:

  • अँटिऑक्सिडेंट
  • दाह कमी करणारे घटक
  • जीवनसत्त्वे
  • खनिजे
  • आवश्यक फॅटी एसिड्स
  • आहारातील फायबर

आता तुम्हाला हळदीच्या दूधातील पोषक तत्त्वांबद्दल माहिती मिळाली आहे, तर आता आपण यापासून होणारे वेगवेगळे फायदे बघूया.

हळदीच्या दुधाचे ११ फायदे

आरोग्य विश्वामध्ये हळदीच्या दुधाला त्यातील आरोग्यवर्धक गुणांमुळे हल्लीच प्रसिद्धी मिळू लागली आहे. हे सोनेरी अमृत, ज्याला 'सोनेरी दूध' देखील म्हणतात, यामध्ये हळदीचे दाह कमी करणारे आणि अॅंटीऑक्सीडंट गुण तसेच दुधाचे पोट शांत करणारे गुण देखील आहेत, ज्यामुळे आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी हे एक चविष्ट पेय सिद्ध होते.

शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट

हळदीच्या दुधातील महत्त्वाचा घटक म्हणजे कर्क्यूमिन, हे हळदीतील एक सक्रिय युग्म आहे. यामध्ये तीव्र अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत ज्यामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस आणि त्यामुळे शरीराच्या होणाऱ्या नुकसानापासून तुमचे संरक्षण होते. तसेच, बऱ्याच हळद-दुधाच्या पाककृतींमध्ये दालचीनी आणि आले देखील वापरतात. या दोन्हींमध्ये विलक्षण अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत.

दाह कमी करते

हळदीच्या दुधातील उपस्थित युग्मांमध्ये दाह कमी करण्याचे तीव्र गुणधर्म आहेत. दीर्घकाळ होत असलेल्या जळजळीमुळे अनेक आजार उद्भवू शकतात, जसे कॅन्सर, मेटाबॉलिक सिंड्रोम, अल्झायमरचा आजार, आणि हृदयाशी निगडीत आजार. हळदीच्या दुधातील दाह कमी करणारे गुणधर्मांमुळे ऑस्टियोआर्थरायटिस आणि संधिवातासारख्य सांधेदुखी प्रभावीपणे कमी होतात.

प्रतिकार शक्ति वाढवणारे

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का सर्दी झाल्यावर तुमची आजी तुम्हाला गरम गरम हळदीचे दुध प्यायला का द्यायची? कारण हळदीच्या दुधामुळे तुमच्या प्रतिकार शक्तीला असंख्य प्रकारे फायदे होतात. कर्क्यूमिनमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस याला रोखणारे गुणधर्म आहेत ज्यामुळे तुम्हाला संक्रमणांशी लढण्यासाठी मदत होते. तसेच, आल्यातील ताजे युग्म काही बॅक्टेरियाची वाढ रोखू शकते.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करणारे

या सोनेरी दूधामध्ये उपस्थित घटक, विशेषतः आलं आणि दालचीनी, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यामध्ये मदत करू शकतात. हळदीच्या दुधाच्या फायद्यांबरोबरच तुमच्या जेवणामध्ये आल्याचा नियमित वापर केला तर रक्तातील उपवासाच्या अगोदरची साखरेची पातळी कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते.

कॅन्सरचा धोका कमी करणारे

हळदीच्या दुधातील कर्क्यूमिनमुळे कॅन्सरचा धोका कमी करण्यामध्ये मदत होते. हे कर्क्यूमिन हळदीमध्ये असलेले एक गुणकारी युग्म आहे. हळदीच्या दुधाला एक सक्षम आणि प्रतिबंधक पेय बनवणाऱ्या कर्क्यूमिनचे दाह कमी करणारे आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म पेशींचे नुकसान होण्यापासून सुरक्षा प्रदान करतात आणि कॅन्सर पेशींची वाढ रोखण्याचे काम करतात. तथपि, याबाबतीत कोणतेही ठाम मत बनवण्याआधी काही अजून अभ्यास करण्याची गरज आहे.

हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करणारे

हळदीचे दुध घेतल्यामुळे हृदय सुरक्षित ठेवणारे परिणाम शरीरावर होतात. अभ्यासात असे लक्षात आले आहे की हळदीतील उपस्थित कर्क्यूमिन एंडोथेलियल क्रिया सुधारते, रक्तवाहिन्या रुंद होतात आणि पर्यायाने हृदयावरचा ताण कमी होतो. ही क्रिया व्यायाम किंवा काही औषधांइतकीच प्रभावी आहे, आणि आपोआपच हृदयासाठी सहाय्यक ठरते.

पचन सुधारणारे

तुम्हाला जर वारंवार अपचन किंवा ब्लोटिंगचा त्रास होत असेल तर हळदीचे दूध प्यायल्याने आराम मिळू शकतो. हळद पित्तशामक आहे, म्हणूनच ही पचनास मदत करते. हळदीच्या सोनेरी दुधामध्ये सहसा आलं वापरतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि पोट स्वच्छ होण्यास मदत होते आणि अपचनाची लक्षणे कमी होतात.

स्मरणशक्ती आणि मेंदूच्या क्रिया सुधारणारे

तुम्हाला माहिती आहे का की हळदीचे दूध प्यायल्याने तुमची बुद्धी तल्लख होते? कर्क्यूमिन मेंदुमधून निर्माण होणारा न्यूरोट्रॉफिक घटकांचे (ब्रेन डिराईव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर्स) प्रमाण वाढवते, हे घटक म्हणजे अशा प्रकारच्या हार्मोनची वाढ जे तुमच्या मेंदूला मज्जासंस्थेतील नवीन जोडणीसाठी मदत करतात. संशोधनातून असे समोर आले आहे की मेंदुमधून निर्माण होणाऱ्या न्यूरोट्रॉफिक घटकांचे प्रमाण वाढले की स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदुसंबंधी आजारांचा धोका देखील कमी होतो.

हळदीतील कर्क्यूमिनमुळे तुमचा मूड सुधारणारा परिणाम होतो

सारखे मूडस्विंग्स होत आहेत किंवा अस्वस्थ वाटते आहे? गरम हळद दुधाचा एक ग्लास तुम्हाला आराम देऊ शकतो. संशोधनातून समोर आले आहे की कर्क्यूमिन मध्ये अस्वस्थता कमी करणारे गुणधर्म आहेत आणि जे मूड प्रसन्न करणाऱ्या सेरोटोनिन आणि डोपामाइन यांसारख्या न्यूरोट्रान्समिटर्स मध्ये वाढ करतात.

त्वाचेसाठी उत्तम

हळदीचे अँटिऑक्सिडेंट आणि दाह कमी करणारे गुणधर्म तुमच्या त्वचेला तजेलदार बनवून तुमचं नैसर्गिक सौन्दर्य खुलवते. नियमित हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी होतो, पुरळ बरे होतात, आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.

हाडांचे आरोग्य सुधारणारे

हळदीच्या दुधातील उपलब्ध कॅल्शियमची मुबलक मात्रा हाडांचे आरोग्य प्रभावीपणे सुधारण्यामध्ये मदत करते. यामुळे हाडे मजबूत होतात, हाडे जाड होतात, आणि ऑस्टीओपोरोसिस सारखे आजार होत नाहीत.

हे सोनेरी दूध कसे बनवावे?

तुम्हाला या सोनेरी मिश्रणाबद्दल ऐकले असेलच, पण हळदीचे दूध कसे बनवायचे हे माहीत नाही का? काळजी करू नका! हळदीचे दूध बनवणे एकदम सोपे आहे आणि यासाठी स्वयंपाकघरातील काही नेहमीचेच घटक वापरले जातात.

हळदीचे दूध बनवण्यासाठी खाली सविस्तर कृती देत आहोत.

  • साहित्य गोळा करा: तुम्हाला हवे आहे फक्त 1 कप दूध (डेअरीचे किंवा वनस्पतिचे), 1 चमचा हळद, ½ चमचा दालचीनी पावडर, एक चिमूट काळी मिरी पूड, 1 चमचा मध्य किंवा गूळ, आणि ½ चमचा ताजा आल्याचा कीस.
  • दूध गरम करा: एक कढईत दूध घाला आणि मध्यम आचेवर दूध गरम करा. (आपल्याला दूध उकळायचे नाही, फक्त गरम करायचे आहे)
  • मसाले घाला: हळद, दालचीनी, काळी मिरी, आणि आलं'(हवे असल्यास) गरम दुधात मिसळा. एकजीव करून घ्या.
  • मिश्रण चांगले उकळा: आच मंद करा आणि 5-10 मिनिटे दूध उकळू द्या, मधे मधे ढवळत रहा.
  • गोड जिन्नस घाला: गॅस बंद करून कढई खाली उतरवा आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मध किंवा गूळ घाला.
  • गळून घ्या आणि पिण्यासाठी तयार: हे दूध एका मग मध्ये गाळून घ्या जेणेकरून आल्याचे किंवा मसाल्यांचे बारीक कण निघून जातील. सर्वाधिक फायद्यांसाठी तुमच्या गरम-गरम हळदीच्या दूधाचा आस्वाद घ्या.

निष्कर्ष

अँटिऑक्सिडेंट पुरवण्यापासून ते दाह कमी करणे आणि प्रतिकार शक्ति वाढण्यापर्यंत, हळदीच्या दुधाचे असंख्य फायदे आहेत! तुमच्या संपूर्ण आरोग्यामध्ये लक्षणीय बदल घडवून आणणारे हे एक उत्तम पेय तुमच्या रोजच्या दिनचर्येचा भाग नक्कीच बनू शकते. तथापि, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जरी हळदीचे दूध फायदेशीर असले तरी, हे कोणत्याही वैद्यकीय सलल्यासाठी किंवा उपचारासाठी पर्याय नसू शकतो.

जर तुम्ही वैयक्तिक वैद्यकीय मदत किंवा निदान सेवा शोधत असाल, तर मेट्रोपोलिस हेल्थकेअर तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे. आम्ही अचूक पॅथोलॉजी टेस्टिंग आणि हेल्थ चेक-अप सेवा देतो, आणि ते ही तुमच्या सोयीनुसार - तुमच्या घरी येऊन रक्ताचा नमूना घेतला जाईल. तुम्हाला तुमचे आरोग्य सर्वतोपरी ठेवून स्वतःची काळजी घेता यावी यासाठी आम्ही तुम्हाला अचूक परिणाम आणि वैयक्तिक काळजी पुरवू याबाबत निश्चिंत रहा.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

We value your feedback. Share your thoughts, questions, or suggestions and our team will review them shortly.

  • Stay respectful and constructive.
  • Avoid posting personal or sensitive information.
  • Keep your message clear and concise.

Thank you for being a part of our community and helping us improve.

TruHealth Packages

Choose from our wide range of TruHealth Packages and Health Checkups

Proceed

To book your home visit call us at 080-4891-1400

Book a Home Visit Now!

080-4891-1400