Need help? Talk to our expert.
WhatsApp


विडाल चाचणी - प्रस्तावना, सिद्धांत, प्रक्रिया आणि टायफॉईड तपासणी

Metropolis Healthcare
Last Updated May 02, 2025
Marathi
विडाल चाचणी - प्रस्तावना, सिद्धांत, प्रक्रिया आणि टायफॉईड तपासणी

विडाल चाचणी म्हणजे सेरोलॉजी ब्लड टेस्ट ज्यामध्ये तुमच्या शरीरात टायफॉईड किंवा विषमज्वर असण्याची तपासणी केली जाते. ही टेस्ट जॉर्जेस फर्डिनांड विंडल यांनी सर्वात पहिल्यांदा 1896 मध्ये केली होती आणि यावरूनच या चाचणीचे नाव विडाल चाचणी असे ठेवले गेले.

विडाल चाचणी ही एक विकसित पध्दत आहे ज्याच्या मदतीने तुमच्या शरीराने टायफॉईड तापासाठी कारणीभूत असलेल्या साल्मोनेला बॅक्टेरियाशी लढण्यासाठी तयार केलेल्या अँटीबॉडीजची तपासणी केली जाते. यामध्ये रुग्णाच्या रक्तातील (सीरममधील) ओ आणि एच अँटीबॉडीजची तपासणी केली जाते.

या टेस्टच्या मदतीने जीवघेण्या टायफॉईड तापाची तपासणी केली जाते. तथापि, अचूक परिणामांसाठी या टेस्टचा अभ्यास करणे गरजेचे ठरते.

या ब्लॉग मध्ये पुढे तुम्हाला विडाल चाचणीचा अर्थ, याचे सिद्धांत, प्रक्रिया, आणि टेस्टच्या परिणामांचा अभ्यास या सर्व बाबतीत माहिती मिळेल.

टायफॉईड ताप आणि विडाल चाचणी

टायफॉईड ताप ज्याला विषमज्वर असे ही म्हणतात, एक गंभीर आजार आहे जो साल्मोनेला बॅक्टेरियामुळे होतो. जर तुम्ही दूषित अन्न किंवा पाणी याचे सेवन केले तर या बॅक्टेरियामुळे तुमची पचन संस्था विस्कळीत होते.

टायफॉईड झालेल्या व्यक्तीला थकवा,तीव्र ताप, डोकेदुखी, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, ओटीपोट दुखणे, वजन कमी होणे, आणि लाल चट्टे ही लक्षणे जाणवतील. लवकरात लवकर टायफॉईड तापाचे निदान आणि उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून पुढील अडचणी जसे आतड्यांमधून तीव्र रक्तस्त्राव किंवा आतड्यांना हानी होणे टाळता येऊ शकते.

टायफॉईड तापाची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट्स उपलब्ध आहेत, जसे की मल संवर्धन, अस्थिमज्जा, इ. त्यातीलच एक टेस्ट म्हणजे विडाल चाचणी, ज्यामध्ये टायफॉईड दरम्यान तुमचे शरीर साल्मोनेला बॅक्टेरियाशी लढण्यासाठी जे अँटीबॉडीज तयार करते त्यांची तपासणी केली जाते.

साल्मोनेला बॅक्टेरियामुळे टायफॉईड होतो. हा बॅक्टेरिया संसर्गातून किंवा दूषित अन्न खाल्ल्याने पसरतो. हे बॅक्टेरिया दोन प्रकारचे असतात:

  1. साल्मोनेला टायफी ज्याला एस टायफी देखील म्हणतात,
  2. साल्मोनेला पॅराटायफी, ज्याला एस. पॅराटायफी देखील म्हणतात,

आता बॅक्टेरिया एस टायफीचे दोन अँटिजेन म्हणजेच प्रतिजन असतात:

  1. एस टायफी ओ (ओटी), प्राथमिक प्रतिजन किंवा प्रायमरी अँटिजेन
  2. एस टायफी एच (टीएच), माध्यमिक प्रतिजन किंवा सेकंडरी अँटिजेन

तसेच, एस. पॅराटायफीचे देखील दोन अँटिजेन म्हणजेच प्रतिजन असतात:

  1. एस. पॅराटायफी ए
  2. एस. पॅराटायफी बी

विडाल चाचणीच्या परिणामांचा अभ्यास करून ते समजण्यासाठी, आपण हे परिणाम ब्लॉगमध्ये पुढे बघूया.

विडाल चाचणीचे सिद्धांत

साल्मोनेला बॅक्टेरियाने बाधित अन्न जेव्हा तुम्ही ग्रहण करता, तेव्हा हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात अँटिजेन किंवा प्रतिजन म्हणून प्रवेश करतात. हे अँटिजेन तुमच्या पचन संस्थेपर्यन्त पोहचल्यावर तुमची प्रतिकार शक्ति या अँटिजेन विरुद्ध अँटीबॉडीज तयार करते. परिणामी, अँटिजेन एकत्र येतात, आणि शरीरात टायफॉईड ताप उद्भवतो.

या प्रतिक्रिया चाचणी मध्ये विशिष्ट अँटिजेन विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या शरीराने तयार केलेल्या अँटीबॉडीजची तपासणी केली जाते. जर तुम्हाला टायफॉईड ताप असेल , तर या चाचणी मध्ये तुमचे रक्तामध्ये अँटीबॉडीज असतील जे साल्मोनेला अँटिजेन विरुद्ध प्रतिक्रिया देऊन त्यांना एकत्र करतील.

विडाल चाचणीचा मुख्य सिद्धांत आहे की जर सीरममध्ये अँटीबॉडीज उपस्थित असतील, तर ते एक विशिष्ट अँटिजेनसोबत प्रतिक्रिया देतील आणि टेस्ट कार्डवर त्यांचे समूह दिसण्यास मदत करतील.

या चाचणीचा पुढील टप्पा म्हणजे पॉझिटिव्ह अँटिजेनच्या समूहाची गणना करणे आहे.

विडाल चाचणीची तयारी

स्लाईड विडाल चाचणी

विडाल चाचणीची तयारी करण्यासाठी,आपल्याला खालील साहित्य गरजेचे आहे:

  1. रुग्णाचे सीरम
  2. पिपेट (प्रयोगशाळेतील एक साधन)
  3. सीरम
  4. एस. अँटिजेन (ओ, एच, एएच, बीएच)
  5. स्लाईड
  6. मिक्स करण्यासाठी स्टिक
  7. स्टॉपवाच

आपल्याला काही अभिकारक जसे ओ एजी (सोमॅटिक किंवा सरफेस एजी), एच एजी (फ्लॅगेला), एए एजी, बीएच एजी, ई. देखील लागतील.

विडाल चाचणी प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली जाते:

1. गुणात्मक विडाल चाचणी:

या टेस्टसाठी, आपल्याला 6 रिएक्शन सायकल्स असलेली एक स्लाईड, ज्यावर ओ, एच, एएच, बीएच, पीसी आणि एनसी अशी नावे घातलेली असतील. सर्वात आधी,

  1. रुग्णाच्या सीरमचा एक थेंब चार रिएक्शन सायकल्स म्हणजे ओ, एच, एएच, बीएच मध्ये घाला.
  2. पॉझिटिव्ह कंट्रोलचा एक थेंब पीसी सर्कल मध्ये आणि एनसी सर्कल मध्ये घाला.
  3. आता, अनुक्रमे ओ सर्कल मध्ये ओ अँटिजेनचा, पी सर्कल मध्ये पी अँटिजेन, एएच सर्कल मध्ये एएच अँटिजेन, आणि बीएच सर्कल मध्ये बीएच अँटिजेन घाला.
  4. पीसी आणि एनसी मध्ये ओ, एच, एएच, बीएच पैकी कोणतेही अँटिजेन घाला.
  5. आता, प्रत्येक सर्कल मधले सीरम आणि अँटिजेन व्यवस्थित एकत्र करा जेणेकरून मिश्रण सर्कलच्या बाहेर न जाता स्लाईडlला लागून राहील.
  6. तसेच, एक मिश्रणामध्ये दुसरे मिश्रण एकत्र होऊ देऊ नये, कारण यामुळे टेस्टचे परिणामांवर प्रभाव पडू शकतो.
  7. सर्वात शेवटी, स्लाईड हळू हळू गोल फिरवा आणि सीरम आणि अभिकारक एकत्र झाले असल्याची खात्री करून घ्या.

हे सर्व केल्यावर, तुम्ही परिणाम पाहू शकता. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल तर टेस्ट पीसी (+ve कंट्रोल सर्कल) सर्कल सारखी दिसेल आणि जर ती निगेटिव्ह असेल तर ती एनसी (-ve कंट्रोल सर्कल) सारखी दिसेल. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, जर एकत्रीकरण झाले असेल तर परिणाम पॉझिटिव्ह येतील आणि नसेल झाले तर निगेटिव्ह येतील.

आता जर टेस्टचे परिणाम पॉझिटिव्ह असतील, तर पुढचा टप्प्यामध्ये आपल्याला परिमाणात्मक चाचणी करावी लागेल. टायफॉईड तापाचे झालेले निदान सुनिश्चित करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह अँटिजेनचे अभिकारक घेणार आहोत.उदाहरणार्थ, गुणात्मक चाचणी मध्ये जर ओ पॉझिटिव्ह असेल, तर आपण परिमाणात्मक चाचणीमध्ये ओ अभिकारक वापरणार आहोत.

बऱ्याच बाबतीत, परिणामांची खात्री करण्यासाठी ओ आणि एच, म्हणजेच एस टायफी वापरले जातात. गुणात्मक टेस्ट दरम्यान काहीच व्यक्तींचे एएच किंवा बीएच पॉझिटिव्ह आढळतात.

2. परिमाणात्मक विडाल चाचणी:

ही प्रक्रिया अर्धीच केली जाते असे म्हणायला हरकत नाही, कारण आपण जर ओ पॉझिटिव्ह असेल तर फक्त ओ तपासणार, एच पॉझिटिव्ह असेल तर फक्त एच तपासणार, आणि जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर दोन्ही तपासणार. खालील पद्धतीने ही चाचणी तुम्ही करू शकता:

  1. 8 सर्कल्स असलेली एक वेगळी स्लाईड घ्या: ओ अँटिजेनसाठी चार आणि एच अँटिजेनसाठी चार.
  2. आता, मागील टेस्ट मध्ये जर ओ पॉझिटिव्ह असेल तर रुग्णाचे 5 ul ओ स्लाईड समांतर ठेवून पहिल्या सर्कल मध्ये घाला,10 ul दुसऱ्या मध्ये, 20 ul तिसऱ्या मध्ये , आणि 40 ul चौथ्या मध्ये घाला.
  3. तसेच, चारही सर्कल्स मध्ये विशिष्ट अभिकारकाचा एक एक थेंब घाला.
  4. परिणाम नोंदण्यासाठी, उजवीकडून चिन्हांकित करा. 1:40 चौथ्या सर्कलवर, 1:80 तिसऱ्या सर्कलवर, 1:160 दुसऱ्या सर्कल वर, आणि 1:320 पहिल्या सर्कल वर लिहा.

विडाल चाचणी - स्लाईड पद्धतीचे आकलन

सीरम आणि अभिकारक गुणधर्म एकत्र केल्यावर आणि स्लाईड फिरवल्यावर, परिणाम दिसण्यासाठी काही वेळ वाट बघा. ओ सर्कल मधील 100 जर पॉझिटिव्ह दिसले आणि एच मध्ये 200 पॉझिटिव्ह दिसले तर परिणाम पॉझिटिव्ह आहेत असे समजावे.

वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, जर गणना ओ मध्ये 100 पेक्षा जास्त आणि एच मध्ये एच पेक्षा जास्त असेल तर विडाल चाचणी पॉझिटिव्ह असेल. तथापि, प्रतिजैविक, मलेरिया, डेंग्यु, किंवा जर ताप बरेच दिवस राहिला असेल तर परिणाम निगेटिव्ह येऊ शकतात.

तुम्ही तुमच्या परिणामांचा अभ्यास खालील पद्धतींनी करू शकता:

  • एस टायफी 1:80 पेक्षा कमी किंवा समान असल्यास निगेटिव्ह आणि एस टायफी 1:160 पेक्षा जास्त किंवा समान असल्यास पॉझिटिव्ह.
  • एस पॅराटायफी 1:80 पेक्षा कमी किंवा समान असल्यास निगेटिव्ह आणि एस पॅराटायफी 1:160 पेक्षा जास्त किंवा समान असल्यास पॉझिटिव्ह.

एस टायफी ओ जर पॉझिटिव्ह असेल, तर तुम्हाला प्रभावी ताप आहे. तथापि, एस टायफी एच पॉझिटिव्ह असल्यास, तुम्हाला ताप येऊन गेला आहे. तसेच, जेव्हा ओ आणि एच अँटिजेन्स मध्ये एकत्रीकरण 1:80 पेक्षा कमी किंवा समान असेल तेव्हाच ती विडाल चाचणीची सामान्य पातळी समजली जाईल.

ट्यूब विडाल चाचणी

गुणात्मक आणि परिमाणात्मक विंडल टेस्ट्स व्यतिरिक्त, आणखीन एका पद्धतीची चाचणी केली जाते ती म्हणजे नेहमीची ट्यूब पद्धत. इथे आठ ट्यूब्स घेतल्या जातात, मिश्रण पातळ करून एकत्र केले जाते आणि निरीक्षण केले जाते. पहिल्या तपासणी मध्येच टायफॉईड तापाचे निदान होऊ शकते; तथापि, ट्यूब विडाल चाचणी मध्ये तापाचे निदान प्रभावीपणे होते.

मूळतः, टायफॉईड तापाचे निदान करण्यासाठी दोन ट्यूब्सचा वापर केला जातो:

  • एच एकत्रिकरणासाठी ड्रेयर ट्यूब
  • ओ एकत्रिकरणासाठी फेलिक्स ट्यूब

आजकाल, ओ आणि एच दोन्ही एकत्रिकरणासाठी 3 x 0.5 मिलीच्या कह्न ट्यूब्स वापरल्या जातात.

नेहमीच्या ट्यूब पद्धतीची प्रक्रिया:

विडाल चाचणीची तयारी करण्यासाठी, आपल्याला खालील साहित्य लागेल:

  1. रुग्णाचे सीरम
  2. ओ, एच, एएच आणि बीएच अँटिजेन्स
  3. सामान्य सलाईन
  4. पिपेट
  5. टेस्ट ट्यूब रॅक
  6. टेस्ट ट्यूब्स
  7. वॉटर बाथ (गरम पाण्याने भरलेले प्रयोगशाळेतील एक उपकरण)

ही टेस्ट सुरू करण्याआधी, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की यामध्ये मिश्रण पातळ करून एकत्र केले जाते त्यामुळे हे अचूकपणे करणे आवश्यक आहे. आता आपण हेच जरा सोप्या भाषेत समजून घेऊया.

  1. सर्वात आधी नऊ ट्यूब्स घ्या आणि त्यांना एक रॅक मध्ये ठेवा. ओ साठीच्या ट्यूब्सना 1 ते 9 अशी नावे द्या.
  2. पहिल्या ट्यूब मध्ये 0.1 मिली साधेच सलाईन त्यात घाला आणि एकत्र करा आणि 0.9 मिली सीरम घ्या. तसेच, उरलेल्या सर्व ट्यूब्स मध्ये 0.5 साधे सलाईन्स घाला.
  3. आता, पहिल्या ट्यूब मधील 0.5 मिली आणि ती दुसऱ्यात मिसळा. आता टेस्ट ट्यूब 1 मध्ये 0.5 मिली आणि दुसऱ्या ट्यूब मध्ये 1 मिली मिश्रण उरले असेल.
  4. हीच प्रक्रिया पुन्हा करा. म्हणजेच, शेवटच्या ट्यूब मधून 0.5 मिली घ्या आणि पुढच्या ट्यूब मध्ये 1 मिली मिश्रण बनवण्यासाठी त्यामध्ये घाला. 8 व्या ट्यूब मधून 0.5 मिली घ्या आणि ते एक वेगळ्या ट्यूब मध्ये ठेवा.
  5. सर्व ट्यूब्स मधील मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. आता आपल्याकडे प्राथमिक क्रमिक पातळ केलेले मिश्रण तयार आहे, पहिल्या ट्यूब पासून ते 8 व्या ट्यूब पर्यन्त अनुक्रमे 1:10, 1:20, 1:40, 1:80, 1:160, 1:320, 1:640, आणि 1:1280.
  6. आता नवीन (9 वी) ट्यूब घ्या आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह कंट्रोल घाला.
  7. आता, अनुक्रमे (ओ, एच, एएच, बीएच) सर्व अँटिजेन चे 0.5 मिली सर्व आठ ट्यूब्स मध्ये घाला. आता सर्व ट्यूब्स मध्ये मिश्रणाचे प्रमाण 1 मिली होईल.
  8. सर्व ट्यूब्स मध्ये अभिसारक मिसळून झाले आहेत, आता आपल्याकडे पहिल्या ट्यूब पासून ते 8 व्या ट्यूब पर्यन्त 1:20, 1:40, 1:80, 1:160, 1:320, 1:640, 1:1280, 1:2580 या प्रमाणे अंतिम पातळ मिश्रण तयार झाले आहे.
  9. आता व्यवस्थित एकत्र करा आणि झाकून ठेवा आणि सर्व ट्यूब्सना 37° C वर ऊब द्या. (18 ते 24 तास)

विडाल चाचणी ट्यूब पद्धत समजून घेणे

जर तुम्हाला टायफॉईड ताप आला असेल आणि काही एकत्रीकरण झाले असेल, तर 9 वी ट्यूब (पॉझिटिव्ह कंट्रोल) इतर सर्व 8 ट्यूब्स सारखी दिसेल. जर तुम्हाला कोणताही ताप नसेल, आठ ट्यूब्सच्या सामान्य पतळीमध्ये आणि विडाल चाचणी मध्ये कोणताही बदल होणार नाही.

जर एकत्रीकरण झालेल्या ओ साठीच्या ट्यूब मधील गणना 1:100 पेक्षा जास्त आणि एच साठीच्या ट्यूब मध्ये 1:200 पेक्षा जास्त असेल, तर ही विडाल चाचणी पॉझिटिव्ह (सक्रिय संसर्ग) समजला जाईल. या व्यतिरिक्त, इतर गणना विडाल चाचणीची सामान्य पातळी समजली जाते.

विडाल चाचणीच्या मर्यादा

विडाल चाचणी ही टायफॉईड तापाचे निदान करण्याची अगदी झटपट होणारी आणि अत्यंत प्रभावी टेस्ट आहे यात वादच नाही, परंतु यालाही काही मर्यादा आहेतच, जसे:

  1. विडाल चाचणीचे परिणाम पूर्वी लस दिलेली असल्यामुळे किंवा एस टायफी संसर्गामुळे कधी कधी चुकून पॉझिटिव्ह येऊ शकतात.
  2. विडाल चाचणीमध्ये निदान येईपर्यंत खूप वेळ लागतो; जोपर्यंत निदान होते तोपर्यंत उपचार करण्यासाठी बराच उशीर झालेला असतो.
  3. विडाल चाचणी रुग्णाच्या जुन्या संसर्गामध्ये, सध्याच्या संसर्गामध्ये, किंवा एस टायफी लस यामधील फरक करू शकत नाही.
  4. टायफस, तीव्र फाल्सीपेरम मलेरिया, लिव्हरसंबंधी गंभीर आजार, संधिवात, नेफ्रोटिक सिंड्रोम आणि मायलोमॅ टोसिस असताना जर ही टेस्ट केली तर याचे परिणाम चुकून पॉझिटिव्ह येऊ शकतात.
  5. जसे की अनेक घटक या टेस्टच्या परिणामांवर प्रभाव करू शकतात, टायफॉईडच्या निदानासाठी या टेस्ट वर अवलंबून न राहणे योग्य ठरेल.

तथापि, स्क्रीनिंग साठी किंवा टेस्ट करून घेण्यासाठी कधीही विश्वस्त प्रयोगशाळेचीच निवड करावी. उशिरा किंव निरुपयोगी स्क्रीनिंगमुळे उपचार मिळण्यामध्ये देखील उशीर होऊ शकतो.

विडाल चाचणीची किंमत

विडाल चाचणी ही एक झटपट होणारी आणि परवडणारी टेस्ट आहे जी बऱ्याचदा विकासशील देशांमध्ये केली जाते जिथे टायफॉईड तापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. विडाल चाचणीची किंमत लोकेशन, प्रयोगशाळा आणि निकषांनुसार बदलू शकते. मेट्रोपोलिस लॅब्स मध्ये, विडाल चाचणीची किंमत केवळ xxx आहे.

तुमच्या दिलेल्या नमुन्याचा पाठपुरावा करण्याची, परिणाम डाऊनलोड करण्याची, घरी येऊन तपासण्याची, औषधांची यादी आपलोड करण्याची, ई. सुविधा प्रदान करते. विडाल चाचणी बूक करण्यासाठी आजच मेट्रोपोलिस लॅब्सशी संपर्क करा आणि तत्काळ परिणाम मिळवा.

निष्कर्ष

विडाल चाचणी, टायफॉईड किंवा विषमज्वराचे निदान करण्याची एक झटपट पूर्ण होणारी प्रक्रिया आहे. या तापाचे निदान करण्यासाठी फक्त रुग्णाचे सीरम आणि काही अभिसारक यांची आवश्यकता असते. तथापि, या टेस्टच्या परिणामांवर अनेक घटकांचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे योग्य सुचनांचे पालन करून संसर्ग झाल्यावर एक आठवड्याने टेस्ट करणे कधीही उत्तम.

जर तुम्हाला टायफॉईड ताप आला असेल किंवा त्याची काही लक्षणे जाणवत असतील, तर आजच तुम्ही एक विडाल चाचणी बूक करू शकता.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

We value your feedback. Share your thoughts, questions, or suggestions and our team will review them shortly.

  • Stay respectful and constructive.
  • Avoid posting personal or sensitive information.
  • Keep your message clear and concise.

Thank you for being a part of our community and helping us improve.

TruHealth Packages

Choose from our wide range of TruHealth Packages and Health Checkups

Proceed

To book your home visit call us at 080-4891-1400

Book a Home Visit Now!

080-4891-1400