Need help? Talk to our expert.
WhatsApp


अगदी कमी वेळात हिमोग्लोबीन कसे वाढवावे: अन्नपदार्थ आणि काही नैसर्गिक टिप्स

Metropolis Healthcare
Last Updated May 02, 2025
Marathi
अगदी कमी वेळात हिमोग्लोबीन कसे वाढवावे: अन्नपदार्थ आणि काही नैसर्गिक टिप्स

हिमोग्लोबीन हा एक लोहयुक्त प्रोटीन आहे जो आपल्या लाल रक्तपेशींमध्ये आढळतो आणि रक्ताचा लाल रंग याच्यामुळेच असतो. हे प्रोटीन ऑक्सीजन वाहक आहे आणि संपूर्ण शरीरात ते पोहचवणे हे याचे काम असते. शरीरात ऑक्सीजन पसरवणे या व्यतिरिक्त हे प्रोटीन शरीरात असलेला कार्बनडायऑक्साईड फुफ्फुसांपर्यंत पोचवते आणि नंतर त्याला शरीरातून बाहेर काढले जाते. थोडक्यात काय तर हिमोग्लोबीन हे एक अत्यंत महत्त्वाचे प्रोटीन आहे आणि एका निरोगी आयुष्यासाठी खूप आवश्यक आहे.

हिमोग्लोबीन कमी झाले तर काय होते?

कम्प्लीट ब्लड टेस्ट म्हणजेच सीबीसी टेस्ट करून घ्या आणि तुम्हाला एनिमिया झाला आहे का हे जाणून घ्या

कमी हिमोग्लोबीनमुळे शरीरातील अवयवांना पुरेसा ऑक्सीजन मिळू शकणार नाही आणि त्यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे, हृदयाचे ठोके वाढणे, निस्तेज त्वचा, ई. अनेक लक्षणे दिसू लागतात. रक्तातील हिमोग्लोबीन कमी असेल तर या स्थितीला एनिमिया म्हणतात.

भारतात, विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबीन कमी असणे अगदी सामान्य आहे, वयस्क पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनची सामान्य पातळी साधारणतः 14 ते 18 जी/डीएल असावी, तर वयस्क महिलांमध्ये ही पातळी साधारणतः 12 ते 16 जी/डीएल असते. यापेक्षा कमी पातळी असल्यास हे एनिमियाचे लक्षण आहे.

हिमोग्लोबिन पातळी सुधारण्यासाठी योग्य पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हिमोग्लोबीन निर्मिती मध्ये आणि योग्य पातळी राखणे यामध्ये तुमच्या आहाराची महत्त्वाची भूमिका असते.

हिमोग्लोबीन पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त अशा काही अन्नपदार्थांची नावे खालील प्रमाणे आहेत:

बीट:

बीटामध्ये नैसर्गिकपणे भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि जीवनसत्त्व जसे की बी1, बी2, बी6, बी12 आणि सी असते. या विलक्षण भाजीमधील उपलब्ध पोषकतत्त्वे हिमोग्लोबीन पातळी वाढवण्यात आणि लाल रक्तपेशींच्या पुनर्निर्मितीमध्ये मदत करतात. हे तुम्ही कच्चे किंवा शिजवून कोणत्याही प्रकारे खाऊ शकता.

शेवग्याचा पाला:

शेवग्याचा पाला झिंक,लोह, तांबे, मॅग्नेशियम यासह खनिजे, तसेच अ, बी आणि सी जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे.

शेवग्याचा मुठभर पाला बारीक चिरून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा, त्यामध्ये एक चमचा गूळ घाला आणि छान एकजीव करा. तुमची हिमोग्लोबीन पातळी आणि लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी हे चूर्ण रोज सकाळी नाष्ट्यासोबत घ्या.

हिरव्या पालेभाज्या:

हिमोग्लोबीन वाढवणाऱ्या हिरव्या पालेभाज्या जसे पालक, मोहरीची भाजी, सेलेरी, आणि ब्रोकोली यामध्ये भरपूर प्रमाणात लोह उपलब्ध असते. पालक कच्चा खण्याऐवजी शिजवून खाण्याचा सल्ला दिल जातो कारण कच्च्या पालकामध्ये काही ऑक्सॅलीक एसिड्स असतात ज्यामुळे शरीरात लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. या पालेभाजीमध्ये बी12 जीवनसत्त्व, फोलिक एसिड,आणि इतर महत्त्वाची खनिजे नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात आणि जर तुम्हाला तुमचे हिमोग्लोबीन वाढवायचे असेल तर ही पालेभाजी तुमच्या रोजच्या जेवणाचा एक भाग असायला हवी.

ब्रोकोलीमध्ये लोह, बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्व, फोलिक एसिड आणि इतर आवश्यक खनिजे जसे की मॅग्नेशियम, ए जीवनसत्त्व आणि सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.तसेच, या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात आणि यामध्ये आहारातील आवश्यक फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे, या भाज्यांमुळे तुमचे वजन कमी व्हायला आणि पचन सुधारण्यात देखील मदत करतात.

खजूर, बेदाणे आणि अंजीर:

खजूर आणि बेदाणे दोन्हीमधून लोह आणि सी जीवनसत्त्व एकत्र मिळतात. अंजीर मात्र लोह, मॅग्नेशियम, ए जीवनसत्त्व आणि फोलेट हे भरपूर प्रमाणात असतात. सुकलेलं अंजीर आणि मूठभर बेदाणे आणि 2 ते 3 खजूर रोज सकाळी खाल्ल्याने तुमची शक्ति वाढते आणि तुमची हिमोग्लोबीन पातळी देखील सुधारते. ज्यांना डायबेटिस झालेला आहे त्यांनी हा सुकामेवा प्रमाणात खाणेच योग्य ठरते.

तीळ:

काळे तीळ खाल्ल्याने देखील तुमच्या शरीरातील लोह वाढते कारण त्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, झिंक, सेलेनियम आणि बी6 आणि ई जीवनसत्त्व, आणि फोलेट हे सर्व भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही काळे तीळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवून सकाळी ते खाऊ शकता. 1 चमचा भाजलेले तीळ एक चमचा मधामध्ये मिसळून त्याचे लाडू बनवून घ्या. हे पौष्टिक लाडू रोज खाल्ल्याने तुमच्या शरीरातील लोह वाढण्यास मदत होते.

काही घरगुती उपाय ज्यामुळे हिमोग्लोबीन पातळी वाढू शकते

आहारात फळांचा समावेश करा:

जर्दाळू, सफरचंद, द्राक्ष, केळी, डाळिंब आणि कलिंगड तुमच्या हिमोग्लोबीन पातळी वाढवण्यात मदत करतात.हिमोग्लोबीन वाढवण्याचा प्रश्न यतो तेव्हा सफरचंद हा एक चविष्ट आणि योग्य पर्याय आहे कारण हे फळ सर्वात जास्त लोह असणाऱ्या फळांपैकी एक आहे. डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम यासोबतच प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. यातील नैसर्गिक गुण या फळाला हिमोग्लोबीन कमी असलेल्या व्यक्तींसाठी एक उत्तम फळ बनवतात. तुमची हिमोग्लोबीन पातळी वाढवण्यासाठी याचा समावेश तुमच्या रोजच्या जेवणात करा किंवा गोड दाणे तुम्ही तुमच्या कोशिंबीरीमध्ये देखील घालून खाऊ शकता किंवा मिल्कशेक मध्ये घालून देखील याचा आस्वाद घेऊ शकता.

लोखंडी भांड्यांमध्ये जेवण बनवा:

कारण लोखंडी भांडी तुमच्या जेवणतील लोह वाढवतात, ज्यामुळे हे अन्न कमी हिमोग्लोबीन असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम ठरते.

सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेले अन्नपदार्थांची मदत घ्या:

सी जीवनसत्त्व भरपूर असलेले अन्नपदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा कारण यामुळे लोह चांगल्याप्रकारे शरीरात ग्रहण केले जाते. भरपूर प्रमाणात आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, स्ट्रॉबेरी, ढोबळी मिरची, टोमॅटो, बेरीज आहारात घ्या कारण यामध्ये सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. सी जीवनसत्त्व असलेले हे नैसर्गिक स्त्रोत आहारात नियमित घेण्याची सवयच लावून घ्या.

शरीरात लोह ग्रहण करण्यात अडथळा निर्माण करणारे पदार्थ टाळा:

तुमची हिमोग्लोबीन पातळी कमी असेल तर शरीरात लोह ग्रहण करण्यात अडथळा निर्माण करणारे पदार्थ टाळा. पॉलीफेनॉल, टॅनिन, फायटेट्स आणि ऑक्सॅलीक एसिड असलेले हिमोग्लोबीन युक्त पदार्थ जसे की चहा, कॉफी, कोको, सोयाबीनचे उत्पाद, वाईन, बिअर, कोला आणि एअरेटेड ड्रिंक्स घेणे टाळा.

मध्यम ते उच्च तीव्रतेच्या व्यायामांचा समावेश करा:

तुम्ही जेव्हा व्यायाम करता, तेव्हा शरीरातील वाढलेली ऑक्सीजनची मागणी पूर्ण करण्यासाठी तुमचे शरीर जास्त हिमोग्लोबीन तयार करते.

गरजेचे असेल तेव्हा पूरक पदार्थ आहारात घ्या:

काही बाबतीत फक्त आहारात सुधारणा करून हिमोग्लोबीन पातळी वाढवली जाऊ शकत नाही. कदाचित तुम्हाला लोह पुरवणारी औषधे किंवा काही अतिरिक्त उपचार करावे लागू शकतात. कोणतेही लोह पुरवणारे पूरक औषध घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वेळोवेळी हिमोग्लोबीन पातळी तपासून घेतल्याने कोणतीही समस्या वेळीच लक्षात येऊन योग्य उपचार केले जाऊ शकतात. यामुळे वेळेतच ही पातळी कमी असल्याचे लक्षात येईल आणि त्या दृष्टीने योग्य ते उपाय करता येऊ शकतील.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

We value your feedback. Share your thoughts, questions, or suggestions and our team will review them shortly.

  • Stay respectful and constructive.
  • Avoid posting personal or sensitive information.
  • Keep your message clear and concise.

Thank you for being a part of our community and helping us improve.

TruHealth Packages

Choose from our wide range of TruHealth Packages and Health Checkups

Proceed

To book your home visit call us at 080-4891-1400

Book a Home Visit Now!

080-4891-1400