Need help? Talk to our expert.
WhatsApp


डबल मार्कर चाचणी: म्हणजे काय आणि या टेस्ट दरम्यान काय होते?

Metropolis Healthcare
Last Updated April 28, 2025
Marathi
डबल मार्कर चाचणी: म्हणजे काय आणि या टेस्ट दरम्यान काय होते?

तुमच्या गरोदरपणाच्या 7 ते 9 व्या महिन्याच्या काळात, गर्भात असलेल्या बाळाबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. आणि जेव्हा तुमच्या गर्भातील बाळाचे लिंग आणि इतर क्लिष्ट माहिती एक रहस्य बनून राहते, तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ मात्र तुम्हाला तुमच्या नवीन पाहुण्याच्या येण्याच्या तयारी संबंधी काही टेस्ट्स करायला सांगतात.

डबल मार्कर प्रेगनन्सी टेस्ट मध्ये गर्भातील बाळासंबंधी जर काही अडचणी असतील तर त्या जाणून घेण्यासाठी तुमच्या रक्ताचा नमूना घेतला जातो.

गरोदरपणात डबल मार्कर चाचणी

गरोदरपणाच्या 1 ते 3 ऱ्या महिन्याच्या तपासणींमध्ये डबल मार्कर चाचणी केली जाते, या टेस्टला मॅटर्नल सीरम स्क्रीनिंग देखील म्हणतात. जारी ही टेस्ट निर्णयात्मक वैद्यकीय टेस्ट नसली, तरी गुणसुत्रातील विसंगतींची शक्यता नक्कीच नोंदवू शकते. ही निदान सांगणारी टेस्ट नसून केवळ अंदाज वर्तवणारी टेस्ट आहे.

रक्तातील फ्री बीटा-ह्युमन क्रोनिऑनिक गोनॅडोट्रोपिन (free beta-hCG) आणि गरोदरपणासंबंधी प्लाझ्मा प्रोटीन ए (PAPP-A) यांचे स्तर मोजले जातात.

गर्भातील बाळ जर मुलगी असेल तर सर्वसाधारणपणे XX गुणसुत्रांच्या 22 जोड्या आढळतात, त्याचप्रमाणे जर बाळ मुलगा असेल तर XY गुणसुत्रांच्या 22 जोड्या आढळतात. अतिरिक्त गुणसुत्रांच्या साठण्यामुळे निर्माण होणारी गुणसुत्रांची विसंगती म्हणजे ट्रायसोमी. गुणसुत्र 21 ची अतिरिक्त प्रत असल्यामुळे डाऊन सिंड्रोम होतो, ज्याला ट्रायसोमी 21 असे देखील म्हणतात. गुणसुत्र 18 ज्यामुळे एडवर्ड्स सिंड्रोम होतो) किंवा गुणसुत्र 13 (ज्यामुळे पटाऊ सिंड्रोम होतो) यांच्यापैकी एकाची देखील अतिरिक्त प्रत अढळली असता, ही देखील एक प्रकारची सामान्य गुणसुत्र विसंगतीच आसते.

गुणसुत्र विसंगती असलेल्या काही गरोदरपणाच्या केसेस मध्ये hCG आणि PAPP-A स्तर असामान्य असल्याचे काही पुरावे आहेत.

जरी रक्तस्तर हा तपासणीचा एक भाग असला तरी, न्यूकल ट्रान्सलुसन्सी (NT) स्कॅन्स एक प्रकारच्या अल्ट्रासाऊंड्स असतात ज्यामध्ये रक्तस्तराशिवाय तुमच्या बाळाच्या मानेच्या बाजूचे पारदर्शक ऊतकांचे निरीक्षण केले जाते.

गरोदरपणामध्ये डबल मार्कर चाचणी कधी करावी लागते?

सर्वसाधारणपणे ही टेस्ट पहिल्या तीन महिन्यातच करायला सांगितले जाते जेणेकरून डिलिव्हरीच्या आधी आणि नंतरच्या अडचणी टाळल्या जाऊ शकतात. या संपूर्ण स्क्रीनिंग प्रक्रियेमध्ये रक्तातील बीटा-ह्युमन क्रोनिऑनिक गोनॅडोट्रोपिन (फ्री beta-hCG) आणि गरोदरपणा संबंधी प्रोटीनची मोजणी केली जाते (PAPP-A).

हे स्क्रीनिंग करण्याची संधि मिळण्यासाठी खूप कमी कालावधी उपलब्ध असतो. डॉक्टर किंवा नर्स याबाबत उत्तम सल्ला देऊ शकतात. ही शस्त्रक्रिया साधारणपणे गरोदरपणाच्या 11 व्या आणि 14 व्या आठवड्यात केली जाते.

गरोदरपणात डबल मार्कर चाचणी का केली जाते?

गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत डबल मार्कर चाचणी आणि NT सह स्क्रीनिंग सुचवले जाते परंतु हे अनिवार्य नाही.

तथापि, समजा तुमचे वय 35 पेक्षा जास्त आहे किंवा गुणसुत्र विसंगती असण्याची जोखीम जास्त असेल, जसे की काही डबल मार्कर विशिष्ट विकार असण्याची फॅमिली हिस्ट्री. अशा परिस्थितीत, तुम्ही हे स्क्रीनिंग करून घेणे फायद्याचे ठरेल.

लक्षात असू द्या की या तपासणीचे परिणाम तुम्हाला ट्रायसोमीजचा जर जास्त धोका असेल तर त्याबद्दल सतर्क करतात. जे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या बाळाला अमूक एक असमान्यता असल्याचे कोणत्याही प्रकारे निश्चितपणे सांगितले जाऊ शकत नाही.

जेव्हा तुम्ही ठरवता की डबल मार्कर चाचणी करायची की नाही, तेव्हा हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते की या टेस्टच्या परिणामांचा भविष्यात तुमच्यावर काय प्रभाव पडणार आहे. जर परिणाम सामान्यपेक्षा जास्त असतील तर? तुम्ही आणखीन सूक्ष्म तपासणीसाठीतयार आहात का? तुम्हाला आधीच जर काही संभाव्य अनियमितताबद्दल समजले तर तुम्हाला कसे वाटेल? जेव्हा प्रश्न गरोदरपणातील काळजीचा असतो, परिणाम बघितल्यावर तुमचा दृष्टिकोण बदलेल का?

तुमच्या सगळ्या शंकांना कोणतेही ठाम उत्तर नाही कारण हे पूर्णपणे तुमच्या तेव्हाच्या परिस्थितीवर आणि फॅमिली हिस्ट्रीवर अवलंबून असते.

गरोदरपणात डबल मार्कर चाचणी कशी केली जाते?

डबल मार्कर चाचणीमध्ये रक्ताचा नमूना घेणे आणि न्यूकल ट्रान्सलुसन्सी (NT) स्कॅनचा समावेश असतो. फ्री beta-hCG (बीटा-ह्युमन क्रोनिऑनिक गोनॅडोट्रोपिन) आणि PAPP-A हे दोन मार्कर्स डबल मार्कर चाचणी दरम्यान तपासले जातात. (गरोदरपणासंबंधी प्लाझ्मा प्रोटीन A).

गरोदर महिलांमध्ये प्लेसेंटा फ्री beta-hCG नावाचा एक प्रकरचा ग्लायकोप्रोटीन हार्मोन सोडते. हे जर जास्त प्रमाणात सोडले गेले तर ट्रायसोमी 18 आणि डाऊन सिंड्रोमचा धोका वाढतो.

PAPP-A प्लाझ्मा प्रोटीन हा शरीरातील एक महत्त्वाचा घटक आहे. डाऊन सिंड्रोमचा धोका जास्त असल्याचा अर्थ आहे की प्लाझ्मा प्रोटीनचा स्तर कमी झाला आहे. या टेस्टचे परिणाम पॉझिटिव्ह, धोका जास्त असणे, किंवा नेगेटिव्ह असे असू शकतात.

भारतामध्ये डबल मार्कर चाचणीसाठी किती खर्च येतो?

डबल मार्कर चाचणीचा खर्च तुमचे लोकेशन आणि हेल्थ इन्शुरन्स याप्रमाणे बदलतो. जरी ही टेस्ट करून घेणे तुमच्यासाठी अनिवार्य नसले, तरी तुम्ही टेस्ट केली तर तुमच्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅन मध्ये हा खर्च कव्हर केला जातो.

तुमच्या कव्हरेज आणि टेस्ट करण्याआधी आवश्यक ऑथरायझेशन याबाबत अधिक माहितीसाठी तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी संपर्क करा. जर तुमचे हेल्थ इन्शुरन्स नसेल, तरी तुम्ही हॉस्पिटल किंवा प्रयोगशाळेत थेट संपर्क करून खर्च आणि कोणकोणते पेमेंटचे पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घेऊ शकता.

तुम्हाला जर पहिल्या तीन महिन्यांतील स्क्रीनिंग करून घ्यायचे असेल तर यासाठी आणि NT स्कॅनसाठी पैसे भरावे लागतील, कारण या दोन्ही टेस्ट्स एकत्रच केल्या जातात. डबल मार्कर चाचणीचा खर्च साधारण 2,500 रु. पासून 3,500 रु. पर्यन्त असू शकतो, हे सर्व तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही कोणते हॉस्पिटल निवडले आहे यावर अवलंबून असते.

टेस्टच्या परिणामांमध्ये काय पहावे?

डबल मार्कर चाचणीसाठी केवळ रक्त तपासणी केली जाते. प्रयोगशाळेत तुम्हाला फक्त तुमच्या डॉक्टरांनी ही टेस्ट करून घेण्याचे सुचवल्याची एक चिठ्ठी जमा करावी लागते. काही विशेष सूचना नसतील तर, तुम्ही नेहमीप्रमाणे खाऊन-पिऊन ही टेस्ट करू शकता, कारण ही कोणतीही फास्टिंगची टेस्ट नाही.

परिणाम देण्याचा प्रत्येक प्रयोगशाळेचा कालावधी वेगवेगळ्या असू शकतो. सर्वसाधारणपणे या टेस्टचे परिणाम 3 ते 7 आठवड्यात मिळतात. क्लिनिक मधून तुम्हाला फोन करून परिणाम कळवले जातील किंवा तुम्हाला त्यांना थेट संपर्क करायचा आहे हे तुम्हाला विचारून घ्यावे लागेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डबल मार्कर चाचणी जर पॉझिटिव्ह असेल तर काय करावे लागेल?

हे परिमाण बघून गर्भातील बाळाला कोणताही आजार असण्याची शक्यता तपासली जाते. जर डबल मार्कर चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्या परिस्थितीत या असामान्यतेमागचे कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टर अतिरिक्त निदान प्रक्रिया अजसे की ॲम्नीऑसेन्टेसिस किंवा क्रोनिऑनिक व्हिलस कलेक्शन करण्याचे सुचवू शकतात.

गरोदरपणातील डबल मार्कर चाचणीची सामान्य पातळी किती असावी?

डबल मार्कर चाचणीची सामान्य पातळी 25,700 ते 2,88,000 mIU प्रति mL असावी.

डबल मार्कर चाचणी किती अचूक असते?

डबल मार्कर चाचणी ही केवळ एक अंदाज असतो. याबाबतीत जरा कमी संवेदनशील असणे चांगले! अर्ध्या केसेस मध्ये, या टेस्टचे परिणाम चुकीचे असू शकतात. या टेस्टच्या परिणामांची खात्री करण्यासाठी ॲम्नीऑसेन्टेसिस टेस्ट करून घेणे आवश्यक असते.

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

We value your feedback. Share your thoughts, questions, or suggestions and our team will review them shortly.

  • Stay respectful and constructive.
  • Avoid posting personal or sensitive information.
  • Keep your message clear and concise.

Thank you for being a part of our community and helping us improve.

TruHealth Packages

Choose from our wide range of TruHealth Packages and Health Checkups

Proceed

To book your home visit call us at 080-4891-1400

Book a Home Visit Now!

080-4891-1400